राजापूर आगारात पर्यटन स्थळांची माहिती व किलोमिटर दर्शविणाऱ्या डिजिटल बॅनरचे अनावरण

हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान व प्रदिप कोळेकर यांची संकल्पना

राजापूर l प्रतिनिधी : राजापूर तालुक्यातील विविध पर्यटन स्थळे व राजापूर बस स्थानक यापासून असलेले अंतराची माहिती प्रवाशी व पर्यटकांना व्हावी यासाठी तशा माहितीचा डिजिटल बॅनर हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान राजापूर यांच्या संकल्पनेतून व नवयुग फोटो स्टुडिओ छायाचित्रकार मालक प्रदीप कोळेकर यांच्या माध्यमातून राजापूर आगारात बसविण्यात आला आहे.

या डिजिटल बॅनरचे अनावरण आगार व्यवस्थापक श्रीमती शुभांगी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे. डिजिटल बॅनरवर राजापूर तालुक्यातील पर्यटन स्थळांची सचित्र माहिती व राजापूर आगारातुन या पर्यटन स्थळापर्यंतचे अंतर किती आहे हे नमुद करण्यात आले असून त्याचा लाभ राजापूरात पर्यटनासाठी येणाऱ्या प्रवाशांना होणार आहे.

या डिजिटल बॅनरचे अनावरण प्रसंगी हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश मयेकर, नवयुग फोटो स्टुडिओ छायाचित्रकार मालक व माय राजापूर संस्थेचे संस्थापक प्रदीप कोळेकर, स्वराज्य प्रतिष्ठानचे शिलेदार विवेक गुरव, प्रसन्न देवस्थळी यांसह राजापूर आगारातील वाहतूक निरीक्षक सचिन मोरे, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक प्रकाश झोरे ,वरिष्ठ लिपिक अशोक दातार , लेखाकार नागेश कांबळे ,,वरिष्ठ लिपिक पंकज गार्डी, वाहतूक नियंत्रक अनिल कुवेस्कर ,लिपिक अक्षय मांडवकर, प्रमुख कारागीर गजानन जोशी, व सर्व चालक ,वाहक, यांत्रिक, व प्रवासी वर्ग उपस्थित होते. अशा प्रकारचा डिजिटल बॅनर राजापूर आगारात लावल्याबद्दल आगार प्रशासनाच्या वतीने हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान व कोळेकर यांना धन्यवाद देण्यात आले आहेत.