खेड(प्रतिनिधी) जल फाऊंडेशन कोकण विभाग संस्थेचे सल्लागार वसंत मोरे यांना मुंबई येथील काव्यकुंज साहित्य समुहाच्यावतीने समाजसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेवून माटुंगा येथे झालेल्या कवी संमेलनात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जल फाऊंडेशनच्या माध्यमातून तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला सतावणारी पाणीटंचाईची तीव्रता कमी करून ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी संस्थापक अध्यक्ष नितीन जाधव व सहकाऱ्यांच्या माध्यमातून ते झटत आहेत. सामाजिक क्षेत्रातही त्यांनी भरीव कामगिरी केली आहे.










