शिळ नागवेकरवाडी येथील झुडपात सापडली गावठी दारूची अवैध हातभट्टी; पोलिसांची कारवाई 

रत्नागिरी l प्रतिनिधी :शहरानजीकच्या शिळ नागवेकरवाडी येथील झुडपात गावठी हातभट्टीची दारु बाळगणार्‍या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवार 17 मार्च रोजी सायंकाळी 6.15 वा.करण्यात आली आहे.

दिपक शंकर नागवेकर (रा.शिळ नागवेकरवाडी,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हेड काँस्टेबल प्रविण पाटील यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, रविवारी सायंकाळी संशयित हा शिळ-नागवेकरवाडी रोडच्या बाजुला झाडी-झुडपाच्या आडोशाला गावठी हातभट्टीची 275 रुपयाचीं 5 लिटर दारु विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 कलम 65 (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.