सिंधुदुर्ग रत्नागिरी हा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा गड आहे. गेल्या अनेक वर्षात मंत्री मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते व आता केंद्रीय मंत्री या नात्याने त्यांनी या भागाचा मोठा विकास केला आहे. केंद्रातील अनेक प्रकल्पही त्यांनी मंजूर केले आहेत. त्यामुळे यावेळी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी त्यांनाच मिळावी ही आमची भाजप म्हणून पहिली पसंती आहे. तशा प्रकारची मागणी आम्ही वरिष्ठांकडे केली आहे, अशी माहिती ही यावेळी लोकसभा मतदारसंघ प्रमुख माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिली.
सावंतवाडी येथील भाजपच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँक संचालक तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य महेश सारंग, सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, भाजपा किसान मोर्चा जिल्हा चिटणीस अजय सावंत, माजी नगरसेवक आनंद नेवगी, विनोद सावंत आदी उपस्थित होते.











