तरुणाने बनवला हेलिकॉप्टर, त्याच्याच पंख्याने कापला गळा; मृत्यूचा थरारक VIDEO

वी दिल्ली : काहीतरी नवीन तयार करणारे, जुगाड करणाऱ्या लोकांची जगात कमी नाही. असाच एक जुगाडू तरुण ज्याने वयाच्या 24 व्या वर्षी स्वतःचं हेलिकॉप्टर बनवलं. पण याच हेलिकॉप्टरने त्याचा जीव घेतला आहे.

या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो पाहून सर्वांना धडकी भरली आहे.

हेलिकॉप्टर अपघाताचा हृदयद्रावक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका 24 वर्षांच्या तरुणाने स्वत:हून हेलिकॉप्टर बनवलं त्याच हेलिकॉप्टरच्या पंख्याने त्याचा गळा कापला गेला आहे.

ज्याला घडवलं त्यानंच घेतला जीव

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता त्या व्यक्तीने दोन आसनी हेलिकॉप्टर बनवले आहे आणि तो स्वत: आत बसला आहे आणि यादरम्यान हेलिकॉप्टरचा पंखा वेगाने फिरत आहे, पण त्याच दरम्यान हेलिकॉप्टरचा पंखा तुटतो आणि तो खाली पसळून थेट आत बसलेल्या व्यक्तीच्या गळ्याला लागतो. ज्यात त्याचा गळा कापला जातो.

या हृदयद्रावक अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सच्या @CriminalTube या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती या पोस्टमध्ये देण्यात आली आहे.

अवघ्या 30 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 1.2 दशलक्ष म्हणजेच 12 लाख वेळा पाहिला गेला आहे, तर 7 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक करून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युझरने लिहिलं आहे की, ‘मिलीसेकंदात घडलेला हा मृत्यू अविश्वसनीय आहे’, तर दुसऱ्याने लिहिलं आहे की, ‘आयुष्य अनिश्चित आहे’ कोणालाही, कधीही काहीही होऊ शकते.