तिसंगीमध्ये गावठी हातभट्टी दारूअड्ड्यावर धाड, ७६ हजाराचा मुद्देमाल जप्त

crime daru
खेड(प्रतिनिधी)
खेड तालुक्यातील  तिसंगी पिपळवाडी जंगलमय भागात  बुधवारी सकाळी ८.३० वा च्या सुमारास   येथील पोलिसांनी  सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर अचानक धाड टाकून सुमारे ७६ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी देवानंद महीपत भोसले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टाकण्यात आलेल्या धाडीत  ७६,४५० रु. कि.मध्ये १ ४२,५००- रुपये त्यामध्ये ५०० लीटर मापाच्या प्लास्टीकचा एकुन ०५ टाक्या असुन त्यापैका ०४ टाक्यांमध्ये ५०० लीटर प्रमाणे एकुन २००० लीटर गुळ नवसागर मिश्रीत तयार केलेले कुजके रसायन  २५ हजार  एक मोठ्या आकाराची सुमारे १००० लिटर मापाची लोखंडी पत्र्याची टाकी   ८,७५०/- ६५-लीटर गावठी दारु ,  २०० रुपये किंमतीचा एक काळपट रंगाचा एक इंची प्लास्टीकचा पाईप आदी साहित्य जप्त करण्यात आले.