रत्नागिरी : राजापूर नगरपरिषदेच्या माजी उपनगराध्यक्ष शिला सुरेश शेट्ये (वय ८२) यांचे बुधवारी सायंकाळी उपचार सुरू असताना एका खाजगी रुग्णालयात निधन झाले.
गुरुवारी सकाळी त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहरातील विविध क्षेत्रातील माणसं उपस्थित होते. 21 डिसेंबर 1992 ते 20 डिसेंबर 1993 एक वर्षाच्या कालावधीत त्या राजापूर शहराच्या उपनगराध्यक्ष होत्या तर त्यांनी नगरसेवक म्हणून त्यांनी पाच वर्षे राजापूर शहराची सेवा केली. सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय होते. त्यांच्या पश्चात मुलगा माजी स्वीकृत नगरसेवक नागेश शेटे, दोन विवाहित मुली, जावई, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे.












