मालवण येथील पर्यटन व्यावसायिकांच्या कार्यशाळेत पर्यटन मंत्रालय प्रकल्प समन्वयक मंदार हाडके यांची माहिती
अमित खोत | मालवण : केंद्र सरकारने भारतातील पर्यटन क्षेत्रात वाढ होण्यासाठी देशातील 58 जिल्ह्याची निवड केली असून महाराष्ट्र राज्यातील एकमेव सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड करण्यात आली असून सदर योजना स्वदेश 2 या नावाने कार्यान्वित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शाश्वत पर्यटनासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या च्या माध्यमातून नियोजन बद्ध सुरवात झाली असून या नुसार जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रातील हॉटेल, होम स्टे, ऍग्रो टुरिझम, रीसॉर्ट क्षेत्रातील पर्यटन व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी निधी पोर्टल रजिस्टर माहितीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे पर्यटन व्यावसायिकांची कार्यशाळा संपन्न झाली. पर्यटन मंत्रालय प्रकल्प समन्वयक मंदार हाडके यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी मंदार हाडके म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असून केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात सिंधुदुर्ग हा एकमेव जिल्हा केंद्रीय स्वदेश दर्शन पर्यटन योजनेत समाविष्ट करण्यात आला आहे. या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाश्वत पर्यटन विकासासाठी कार्य होणार आहे. स्थानिक पर्यटन व्यावसायिकांच्या समन्वय साधून कार्य केले जाणार असल्याचे सांगितले तसेच यावेळी निधी पोर्टल वर पर्यटन व्यावसायिकांनी कश्या पद्धतीने नोंदणी करावी यांचे मार्गदर्शन केले. न्याहरी निवास सर्वेक्षण तसेच कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण कार्यक्रम जिल्ह्यातील तालूका स्तरावरील गावा गावात राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी स्वदेश दर्शन समिती सदस्य तसेस पर्यटन व्यवसायिक महासंघ अध्यक्ष विष्णू मोंडकर म्हणाले, जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय स्थानिकांनी कुठल्याही शासकीय मदतीशिवाय स्वकर्तृत्वावर उभा केला असून ह्या भागात आज जिल्ह्यात पर्यटन व्यवसाय बहरतं आहे. जिल्ह्यातील शाश्वत पर्यटन विकासासाठी स्वदेश दर्शन योजनेच्या माध्यमातून सागरी पर्यटना बरोबर कृषी, मेडिकल, हिस्ट्री जंगल टुरिझम क्षेत्रात काम काम होणार असून स्थानिक पर्यटन व्यावसायिक आणि प्रशासन या मध्ये समन्वय साधणे, पर्यटन स्थळांवर आवश्यक सुविधा निर्माण करणे साठी प्रयत्न केला जाणार आहे, असे सांगितले.
पर्यटन व्यावसायिक महासंघाचे मालवण शहर अध्यक्ष मंगेश जावकर यांच्या हस्ते मंदार हाडके यांचा सत्कार करण्यात आला.
स्थानिक जिल्ह्यातील व्यावसायिकांनी या मध्ये सहभाग घेतला यावेळी पर्यटन व्यावसायिक महासंघ सल्लागार गुरु राणे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी मिलिंद झाड, किशोर दाभोलकर, प्रफुल मांजरेकर, सुनील देसाई, दादा वेंगुर्लेकर यांसह अन्य पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.












