भरणे नाका येथे जुगार अड्ड्यावर धाड एकावर गुन्हा

crime jugar
 खेड(प्रतिनिधी)
भरणे नाका येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर येथील पोलिसांनी अचानक धाड टाकून ४ हजार २०० रुपयांचा मुद्दे माल जप्त करत एकावर गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई गुरुवारी करण्यात आली
निलेश महेंद्र शिगवण वय ४० वर्ष रा-भडगाव उसरेवाडी ता-खेड असे त्या गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे  २८ मार्च रोजी  भरणे येथील बापु वडापाव सेंटरच्या पाठीमागे शिगवण हा दैनिक पेपर मध्ये प्रसिदध होणाऱ्या शुभ अंकावर पैसे लावुन मटका जुगाराचा खेळ खेळवित असताना मिळून आला. निलेश महेंद्र शिगवण यांच्या जवळ ४ हजार २००- रु रोख रक्कम मिळुन आली ,एक पावती बुक त्यामध्ये अंक लावुन पैसे घेतल्याच्या नोदी दिसत आहेत तसेच त्यामध्ये एक निळ्या रंगाचा कार्बन पेपरचा तुकडा आहे असे साहित्य मिळून आले.