सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यात रविवारी दुपारपासून पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू झाला. मुसळधार पावसामुळे महावितरण ची बत्ती गुल झाली तर काही ठिकाणी पडझड झाली. पावसामुळे जि. प. शाळा चराठे न.१ ची रस्त्या लगत असलेली संरक्षक भिंत कोसळली. मात्र, सुदैवाने अपघात होण्यापासून वाहन चालक बचावले. त्याबाबतची माहिती चराठा उपसरपंच अमित परब यांनी दिली आहे.











