लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील वाकेड येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वाकेड नंबर १.शाळेच्या दोन विद्यार्थ्यांची सलग तिसऱ्या वर्षी जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे.
यापूर्वी वाकेड नंबर १.शाळेच्या १४ विद्यार्थ्यांनी मंथन व बीडीएस सारख्या स्पर्धा परीक्षेत भाग घेऊन उज्वल यश संपादन केलेले आहे.
यावर्षी शाळेच्या कु.स्नेहल बाळू वाघमारे आणि कु. स्मित जयवंत जाधव या दोन विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक संजय डंबे, वर्गशिक्षक बाळू वाघमारे , नितीन शेंडगे यांचे मार्गदर्शन लाभले.
ही निवड झाल्याबद्दल व शाळेने सलग तिसऱ्या वर्षी सुयश संपादन केल्याबद्दल त्यांचा शिक्षण विभाग व शाळेच्या वतीने अभिनंदन व सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. बंडगर , केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. लाखण , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक चव्हाण मुख्याध्यापक संजय डंबे , शिक्षक श्री. शेंडगे श्री. वाघमारे पालक आदी उपस्थित होते.












