राजापूरात बुधवारी श्रीराम नवमी उत्सवाचे आयोजन

राजापूर (वार्ताहर): ऐतिहासिक महत्व असलेल्या शहर बाजारपेठेतील श्री विठ्ठल राम पंचायतन मंदिरात बुधवार १७ एप्रिल रोजी श्रीराम नवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त सकाळी 9.30 वाजता अभिषेक पूजा, सकाळी 10.30 वाजता रामजन्मोत्सव कीर्तन बुवा ह. भ. प. कु. निकिता नरेश शेलार देवाचे गोठणे, राजापूर हार्मोनियम साथ समीर भोगटे, तबला साथ आर्यन कुशे करणार आहे. दुपारी 12 वाजता रामजन्म सोहळा आरती व प्रसाद.संध्याकाळी 5.00 वाजता सामुदायीक राम तांडव स्तोत्र पठण, राम नामस्मरण गजर, सामूहिक रामरक्षा पठण होणार आहे. या कार्यक्रमाला लहान-मोठे स्त्री-पुरुष सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन भक्तवत्सल भक्तिभाव मंडळ, संभाजी पेठ मित्रमंडळ राजापूर, राधेश्याम भजनी मंडळ, संभाजी पेठ महिला मंडळाचे वतीने करण्यात आले आहे.