ओटवणे(प्रतिनीधी) नुकताच एस.टी.एस.सी.परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात जिल्हा . प.शाळाओटवणे नंबर १ च्या विद्यार्थ्यानी यश मिळविले असून शाळेतली ६ विद्यार्थ्यानी मेडल प्राप्त केले.यात इयत्ता दुसरी मधील लक्ष्मण गावकर ब्राँझ मेडल, सौरभ देवळी इयत्ता दुसरी सिल्व्हर मेडल, रुद्र बुराण इयत्ता सहावी ब्राँझ मेडल, प्रमोद गावकर सहावी ब्राँझ मेडल, स्वाती तारी सातवी ब्राँझ मेडल, तन्मय गावकर इयत्ता सातवी ब्राँझ मेडल या विद्यार्थांनी एस. टी एस. परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.
विध्यार्थ्यांना शाळेचे मार्गदर्शक शिक्षक संगीता कविटकर मॅडम, सागर मेस्त्री सर, आणि प्रकाश गावडे सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले . सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय कमिटी अध्यक्ष मंगेश गावकर, शालेय कमिटी,पालक ग्रामस्थ, यांसकडून अभिनंदन करण्यात येत आहे.











