अमित खोत | मालवण : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मालवण येथील भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांनी कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजप नेते कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे उपस्थित होते.

यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, माजी सभापती अजिंक्य पाताडे, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गांवकर, संचालक आबा हडकर, नाभिक समाज जिल्हाध्यक्ष जगदीश चव्हाण, महेश मांजरेकर, दीपक सुर्वे, हरेश गांवकर, संतोष गांवकर, दत्ता वराडकर, संजय लोके, विशाल गोलतकर, नारायण लुडबे, जॉमी ब्रिटो, संजय कदम यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.










