खेड(प्रतिनिधी) शहरातील शिवतररोड येथील आरक्षण क्र. ७ मध्ये मध्ये बच्चेकंपनीसह आबालवृद्धांच्या विरंगुळ्यासाठी उभारण्यात येत असलेल्या उद्यानाच्या कामाने वेग घेतला आहे. सद्यस्थितीत संरक्षक भिंतीसह सपाटीकरणाचे काम गतीने सुरू आहे.
नगरपरिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत येथील नगरपरिषद हद्दीतील आरक्षण क्र. ७ येथे २ कोटी २५ लाखांचा निधी आमदार योगेश कदम यांच्या पाठपुराव्यानंतर मंजूर झाला आहे. येथील रहिवाशांनी आमदार योगेश कदम यांच्याकडे उद्यानासाठी सातत्याने निवेदने दिली होती. याची गंभीर दखल घेत आमदार कदम यांनी उद्यानासाठी निधी मंजूर केला आहे.
या उद्यानात अद्ययावत खेळण्याची उपलब्धतता करण्यात येणार आहे. यामुळे परिसरातील बच्चेकंपनीला खेळण्यासाठी हक्काचे ठिकाण उपलब्ध होणार आहे. याशिवाय आबालवृद्धांनाही फावला वेळ उद्यानात घालवणे शक्य होणार आहे.
फेब्रुवारीपासून उद्यानाच्या कामास प्रत्यक्षात प्रारंभही झाल्याने रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.









