कणकवली :भाजप ची 13 वी यादी जाहीर झाली आहे.रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून केद्रीय मंत्री नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर जाहीर केली आहे.
गेले खूप दिवस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कोण उमेदवार राहणारे याबाबत उलट सुलट चर्चा होत होत्या त्याला पूर्ण विराम मिळाला आहे.
सिंधुदुर्ग- रत्नागिरी लोकसभा मतदार संघातून भाजप नेते आणि केंद्रिय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी देण्याचे निश्चिच झाले आहे. भारतीय जनता पक्षाने लोकसभा उमेदवारांची १३ वी यादी घोषित केली असून त्यामध्ये रत्नागिरीमधून नारायण राणेंना उमेदवारी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तत्पुर्वी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत किरण सामंत यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचे स्पष्ट केले आहे.













