जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुहागर उर्दू येथे मतदान जनजागृती

अंजनवेल | वार्ताहर : गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुहागर उर्दू येथे शाळेतील विद्यार्थी आपल्या आई व बाबांना ( पालकांना)मतदान जनजागृती करण्यासाठी पत्र दिले.
आपण सर्वजण भारत देशामध्ये राहतो. भारत हा लोकशाही असलेला देश आहै. व भारताच्या लोकसभेच्या निवडणूका सध्या सुरु आहेत.

आपण 32रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये राहात आहोत. व रायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक दिनांक ७ मे २०२४ रोजी आहे. आपल्या भारताची लोकशाही मजबूत करण्यासाठी तुम्ही दोघेही नक्की मतदान करा. ह्या मतदान कार्यक्रमांमध्ये गुहागर उर्दू शाळेतील पालक मुस्कान तुरुक, अफसरा होडेकर, आलिशा तुरुक, यासीन हवालदार, शबाना मुजावर उपस्थित होते