उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा म्हणजे चैतन्य आणि उत्साह!

भाजपा महायुतीचे उमेदवार ना. नारायण राणे यांच्या राजापूर येथील प्रचार सभेला उदंड प्रतिसाद 

राजापूर । प्रतिनिधी

ते आले… आपल्या सुहास्याने सारे वातावरण भारून टाकले… देशासाठी आणि कोकणच्या विकासासाठी कमळाचे बटन दाबा… मोदी आणि राणे हे विकासाचे कॉम्बिनेशन आहे… असे सांगतानाच त्यांनी विरोधकांवर घणाघात केला… आणि खर्या अर्थाने रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील निवडणुकीत महायुतीच्या प्रचारात चैतन्य निर्माण झाले… राज्याचे उपमुख्यमंत्री भाजपा नेते सर्वप्रिय नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीतील ना. नारायण राणे यांची राजापूर येथील प्रचार सभा सर्वार्थाने उत्साह वाढवणारी ठरली.

भाजपा आणि महायुतीचे उमेदार केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राजापुरात आले होते. आज राज्यातील दूरगामी नेतृत्व म्हणून फडणवीस यांच्याकडे पहिले जाते, त्यामुळे त्यांना ऐकण्यासाठी रत्नागिरीतील अन्य तालुक्यांसह सिंधुदुर्ग मधून मोठ्या संख्येने नागरिक राजापूर येथील राजीव गांधी मैदानावर उपस्थित होते. सर्वत्र भाजपा, शिवसेना मनसे सह सहयोगी पक्षांचे झेंडे, सर्वत्र भगवे वातावरण, येणाऱ्या प्रत्येकाला ऐकू येणारी जोशपूर्ण प्रचार गीते, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांचे भलेमोठे कट आऊट आणि भव्य मंडपातील प्रचंड गर्दीमध्ये ना. राणे यांची प्रचार सभा उत्साहात आणि जोशपूर्ण वातावरणात पार पडली.

यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार प्रवीण दरेकर, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, किरण सामंत , माजी आमदार राजन तेली, प्रमोद जठार, बाळ माने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित यशवंतराव, शिवसेना, भाजपा, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, रिपब्लिकन पार्टीचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, सर्व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

देशासाठी, देशाच्या सुरक्षेसाठी, कोरोना काळात आपल्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद करण्यासाठी आणि कोकण विकासाचे सूत्र ज्यांना उत्तमपणे माहिती आहे त्या ना. नारायण राणे यांना निवडून देण्यासाठी ही निवडणूक किती महत्वाची आहे याची जाणीव ना. फडणवीस यांनी आपल्या जोशपूर्ण भाषणात करून दिली. त्यांच्या चैतन्यमय उपस्थितीमुळे संपूर्ण वातावरण विजयी वातावरण झाल्याच्या प्रतिक्रिया यावेळी उपस्थितांमधून प्रगट होत होत्या.