सालपे ग्रा.प. सदस्य संकेत घाग यांनी आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह केला भाजपा प्रवेश

लांजा तालुका उबाठा गटाला आणखी एक धक्का

लांजा (प्रतिनिधी) सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पुन्हा एकदा लांजा तालुका शिवसेनेला (उबाठा गट )धक्का दिला असून आज शुक्रवारी सालपे ग्रामपंचायत सदस्य संकेत घाग हे आपल्या सहकारी, कार्यकर्त्यांसह भाजपात दाखल झाले. त्यांचे आमदार नितेश राणे यांनी स्वागत केले.

 

गेल्या काही दिवसांपासून लांजा तालुक्यात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत आहेत. याचाच एक भाग म्हणून आज शुक्रवारी सालपे गावचे ग्रामपंचायत सदस्य आणि शिवसेना उबाठा गटाचे कार्यकर्ते असलेले संकेत घाग यांनी आज आपल्या कार्यकर्ते व सहकार्यांसह भाजपा मध्ये जाहीर प्रवेश केला. राजापूर येथे झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमाप्रसंगी संकेत घाग यांच्यासह सुरज कांबळे, राजदीप जाधव ,संगम जाधव, विनीत जाधव, नथुराम कांबळे, आदर्श कांबळे, मयूर कांबळे, अशोक पाले, सुरेश पोवार, संकेत कोलते, अंकुश कांबळे, शरद पोवार, संजय पोवार ,स्वप्नाली पोवार, विठोबा पोवार, मंगला पोवार, प्रकाश पोवार, रंजना पोवार, आशा पोवार ,मनोहर सुर्वे, किशोर भितले, रवींद्र कांबळे, गुरु गुरव आदींनी जाहीर प्रवेश केला.

 

या सर्वांचे आमदार नितेश राणे यांनी पक्षाची शाल घालून स्वागत केले.या पक्षप्रवेशासाठी विधानसभा प्रमुख उल्का विश्वासराव ,भाजपा युवा मोर्चाचे लोकसभा संयोजक संजय यादव तालुकाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर यांनी प्रयत्न केले.