माखजन हायस्कुल च्या विद्यार्थ्यांची अविष्कार ला भेट

माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील माखजन इंग्लिश स्कूल च्या गुरुकुल पूरक उपक्रमातील विद्यार्थ्यांनी रत्नागिरी येथील मतीमंद मुलांच्या अविष्कार संस्थेला व फाटक मुक व कर्ण बधिर मुलांच्या शाळेला भेट दिली.

 

ही अभ्यास सहल असल्याने विद्यार्थ्यांनी भेटीत तिथली व्यवस्था,मतिमंद मुलांच्या अडचणी जाणून घेतल्या.मतिमंद मुलांची व मुककर्ण बधिर मुलांची दैनंदिनी जाणून घेतली.अविष्कार संस्थेची चालू असलेले कार्य जाणू न घेतले.विद्यार्थ्यांनी तारांगणं पाहिले.
यावेळी गुरुकुल उपक्रम प्रमुख सचिन साठे,गौरव पोंक्षे,ओंकार मुळे उपस्थित होते.