जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा हातीव नं १ येथे करिअर मार्गदर्शन

माखजन |वार्ताहर
संगमेश्वर तालुक्यातील जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा हातीव नं.१ च्या व्यवस्थापन समितीच्या वतीने परिसरातील विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.

 

 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मुख्याध्यापक सुनिल करंबेळे यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा.मिलिंद कडवईकर यांनी करिअर निवडताना कोणती काळजी घ्यावी हे समजावताना छ्त्रपती शिवाजीमहाराज, थॉमस अल्वा एडिसन, डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग सादर केले.बारावीच्या पुढे करिअर करताना कोणत्या सीईटी द्याव्या लागतात,त्यासाठी कशी तयारी करावी लागते हे ही त्यांनी स्पष्ट केले.

 

 

व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना विविध करिअर पर्यायांची माहिती व त्यातील संधी यावर विस्तृत माहिती प्रा.कडवईकर यांनी दिली.या कार्यक्रमाला सरपंच नंदकुमार कदम,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन सुतार,मांगले मॅडम,विनय होडे सर,कदम मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.या मार्गदर्शनाचा लाभ इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी घेतला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व शिक्षकांनी मेहनत घेतली.