सोनुर्ली श्री देवी माऊलीचा उद्या पुन:प्रतिष्ठापना सोहळा

पं. अजित कडकडे यांचा रात्रौ आठ वाजता गायनाचा कार्यक्रम

सावंतवाडी । प्रतिनिधी :
दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सोनुर्ली श्री देवी माऊली देवीचा पुन:प्रतिष्ठापना सोहळा उद्या बुधवार ०१ मे रोजी सपन्न होत आहे. या सोहळ्यानिमित्त सकाळी श्री देवी माऊली देवीचा पुन : प्रतिष्ठापना सोहळा , विवध धार्मिक कार्यक्रम, दुपारी महाप्रसाद व सायंकाळी सुप्रसिद्ध गायक अजित कडकडे यांचा रात्रौ आठ वाजता गायनाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी संगीत स्वरांची सुरेल मैफिल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा भक्तगणांनी व रसिकवर्ग यांनी लाभ घ्यावा असे आवाहन गावकर मंडळी व ग्रामस्थ व आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.