खारेपाटण येथे शिवसेनेकडून महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा झंझावती प्रचार सुरु

शिवसेना कणकवली विधान सभा प्रमुख संदेश पटेल यांनी खारेपाटण येथील प्रचाराचा घेतला आढावा 

कणकवली : लोकसभा निवडणुकीच्या खासदारकीचे महायुतीचे उमेदवार भाजपाचे नेते नारायण राणे यांचा खारेपाटण मध्ये झंझावाती प्रचार सुरु आहे.खारेपाटण येथील सर्व महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी प्रचाराच्या रिंगणात उतरून नारायण राणे यांचा प्रचार करत आहेत. नुकतेच शिवसेना विधानसभा प्रमुख संदेश पटेल आणि युवा जिल्हा प्रमुख प्रमुख सुकांत वरुणकर यांनी खारेपाटण येथे भेट देत महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराचा आढावा घेतला. यावेळी त्यानी शिवसेना कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले व भाजपाच्या पदाधिकारी यांच्या भेटी घेत चर्चा केली. यानंतर ते प्रचारात ही सहभागी झाले.

 

या वेळी तालुका प्रमुख शरद वायंगणकर, उप तालुका प्रमुख मंगेश गुरव,कृषी समिती सदस्य मंगेश ब्रम्हडांदे ,यांच्या सह सरपंच प्राची इसवलकर व ग्राम. प . सदस्य गुरुप्रसाद शिंदे अस्थाली पवार यांच्या सह शिवसैनिक व तसेच पं. स. सदस्य -तृप्ती मालवदे, उपसरपंच -महेंद्र गुरव, राजू वरुणकर,शेखर शिंदे व इतर सर्व भाजपा पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य हे खारेपाटण येथे प्रचारात सहभागी झाले होते. खारेपाटण येथे महायुतीला अनुकूल वातावरण असून नारायण राणे यांना चांगले मताधिक्य मिळेल असा यावेळी विश्वास सर्वांनी व्यक्त केला.