मंडणगड तालुक्यात मतदानाचा टक्का मागील निवडणुकांच्या सरासरी इतकाच

मंडणगड | प्रतिनिधी : 32रायगड –रत्नागिरी लोकसभा मतदान क्षेत्राचे 17 व्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी आज तालुक्यातील 72 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रीया राबवण्यात आली होती ती कुठल्याही अनुचीत प्रकाराशिवाय शांततेत पार पडली. सकाळच्या दोन तासांत मतदारामध्ये अनुत्साह दिसून आला. तरीही सकाळी 10.00 नतंर मतदारांनी मतदानाचा वेग वाढविल्याने दुपारी 1.00 वाजेपर्यंत 36.45 इतके सरासरी मतदान झाली. मंडणगड तालुक्यातील 55043 महीला व पुरुष मतदार या निवडणुकीसाठी पात्र होते.

 

लोकसभेच्या निवडणुकीतील मतदानाची सरासरी टक्केवारी वाढण्यासाठी यावेळी निवडणुक विभागाचेवतीने तालुक्यात जोरदार प्रयत्न करण्यात आले होते, या शिवाय राज्यातील महायुती व महाविकास आघाडीचे नवे गणीत मतदारांमध्ये नवा उत्साह निर्माण करुन मतदानाची टक्केवारीचे गणित वाढण्यासाठी कारणीभूत ठरेल अशी अपेक्षा होती. मात्र या संदर्भातील सर्वच घटकांनी प्रामाणीकपणे केलेले प्रयत्न कमी पडल्याचे दिसून आले.

 

ग्रामपंचायत, स्थानीक स्वराज्य संस्था वा विधानसभेच्या निवडणुकीचेवेळी मतदारांमध्ये मतदानाकरिता असलेला उत्साह बिलकूल दिसून आला नाही. विविध कारणांनी मतदारांमध्ये मतदानाविषयी असलेला अनुत्साह प्रकर्षाने जाणवीला. मे महिन्यातील तपळत्या उन्हाचा मोठा परिणाम मतदानावर झालेला दिसून आला उन्हाचा चटका लक्षात घेता सकाळच्या दोन तासांचे सत्रात जास्तीत जास्त मतदार मतदानासाठी बाहेर पडतील अशी अपेक्षा असताना केवळ सव्वा नवू टक्के इतके कमी मतदान झाले होते. मात्र सकाळी 9.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत या बदल झाला व मतदारांची गर्दी वाढली व मतदानाची सरासरी 39.00 टक्यांपर्यंत पोहचली मध्यल्या तीन तासात मतदात्यांची गर्दी उन्हाळामुळे कमी असली दुपारी 4.00 नंतर उन्हाच्या झळा कमी झाल्यावर पुढच्या टप्यात मतदानाचे प्रमाण वाढताना दिसून आले. वेगेवगेळे पक्षाचे वेगवेगळ्या विचारधारेचे कार्यकर्ते एकत्र येऊन दोन आघाड्याच्या माध्यमातून एकमेकांसमोर असले तरी मतदान बाहेर काढण्यासाठी दोन्ही आघाड्यांतील कार्यकर्त्यांमध्ये फारसा उत्साह दिसून आला नाही. मतदानासाठी मुंबई व महानगरांत तालुक्यातुन स्थलांतरीत झालेल्या मतदारांचा मतदानाची सरासरी वाढवण्यासाठी व ग्रामिण मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी सहभाग सर्व निवडणुकीत महत्वाचा असतो याकरिता सर्वच राजकीय पक्ष विशेष प्रयत्न करताना नेहमीच दिसून येतात यंदाचे निवडणुकीत तालुक्यात मतदानासाठी सुमारे 5 ते 6 मतदार मुंबई व मुंबईचे उपनगरामधून तालुक्यात आलेले असल्याचा अंदाज राजकीय वतुर्ळातून व्यक्त केला गेला आहे. मतदान प्रक्रीया शांततेत पार पडण्यासाठी निवडणुकी निर्णय अधिकारी तथा तहसिलदार श्रीधऱ गालीपिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली 72 मतदान केंद्रावर प्रत्येकी 1 या प्रमाणे 72 मतदान अधिकारी 4 पोलीग ऑफिसर याशिवाय 72 मतदान केंद्रांवर प्रत्येक 1 पोलीस कर्मचारी व 1 आशा वर्कर नियुक्त करुन चोख व्यवस्था करण्यात आलेली असल्याची माहीती निवडणुक विभागाकडून देण्यात आली.