मंडणगड | प्रतिनिधी – न्यायालयाच्या उद्घाटन सोहळ्यात पहिल्यांदाच कष्टकऱ्यांचा सन्मान करण्यात आला हा वेगळा पायंडा यानिमित्त संपूर्ण राज्यभर पोचणार आहे. मंडणगड न्यायालयाचे काम अतिशय जलद गतीने व विशेष लक्ष देऊन पूर्ण करण्यात आले. संपूर्ण जिल्हाभरातून नव्हे तर राज्यभरातून कामगार या ठिकाणी कामाला आले. अतिशय कमी कालावधी व अतिशय कठीण परिस्थिती इमारतीची काम पूर्ण झाले. याची दखल सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती श्री. भूषण गवई यांच्याबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी घेतली आणि जाहीर कार्यक्रमात इमारत पूर्ण करण्यासाठी राबलेल्या हातांचा सन्मान करण्यात आला.
इमारत बांधकाम म्हणजे कष्टाचे व लौकीक अर्थाने अंग मेहनतीचे काम आहे. सरन्यायाधीशांनी जेव्हा जाहीर कार्यक्रमात बांधकाम कामगारांचे सत्कार करण्याची संकल्पना मांडली तेव्हा कामाचे ठेकेदार मधुकमल कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक संदीप पाटील यांनी सत्कार कामागारांच्यावतीने स्विकारण्यापेक्षा प्रत्यक्ष कामगारांना हा मान मिळावा असे सांगीतले. त्यातून शिवनंदन साहो, कामगार, अक्षय माटे व जींतुबाईंचे नावे पुढे आली. आज त्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सरन्यायाधीशांच्या हस्ते साडीचोळी, व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. याचबरोबर गेली दोन महिने उन वारा पाऊस यांची तमा न बाळगता एक महिला बांधकाम कामगार इमरतीचे कामात व्यस्त होती सरन्यायाधीशांनी आपल्या मनोगतात बांधकाम कामगाराचा सत्कार करुन बाबासाहेबांना आपेक्षीत काम करीत असल्याचा उल्लेख केला
फोटो ओळी –
न्यायालय उद्घाटन समारंभानंतर आयोजित स्वागत समारंभात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते सत्कार करताना कामगार












