आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर यांची मागणी
आंबोली । प्रतिनिधी : आंबोली भाजपा पदाधिकारी महेश पावसकर यांनी भाजपा पक्षाचा पदाधिकारी पदाचा व सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे . आंबोली मध्ये भारतीय जनता पक्ष वाडीसाठी सुरवातीच्या काळात श्री महेश पावसकर यांनी आंबोली सरपंच कै. बाळा पालेकर यांच्या सोबत जी मेहनत घेतली व त्यामुळे आंबोली मध्ये भाजपा पक्ष वाडीसाठी श्री महेश पावसकर यांनी दिलेले योगदान पाहता भाजपा सावंतवाडी विधानसभा प्रमुख श्री राजन तेली व आंबोली मंडळ अध्यक्ष श्री रवींद्र मडगावकर यांनी आंबोली भाजपा पदाधिकारी श्री महेश पावसकर यांनी दिलेला पक्षाचा राजीनामा स्वीकारू नहे.
जर काही समज गैरसमज असतील पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकारीनी त्या बाबत सर्वांची एकत्र बैठक घेऊन चर्चेतून मार्ग काढावा.
मात्र कोणत्याही परिस्थितीत पक्ष हिताचा विचार करता राजीनामा स्वीकारू नहे अशी मागणी आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर यांनी भाजपा सावंतवाडी विधानसभा प्रमुख श्री राजन तेली व आंबोली मंडळ अध्यक्ष श्री रवींद्र मडगावकर यांच्या कडे केली.











