खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील मुंबई ते गोवा जाणारे रोडवर पिरलोटे येथील विरुंगळा हाँटेलच्या अलीकडे .०६ मे रोजी रात्री ०९.५५ वाजण्याच्या सुमारास खेड येथून चिपळूणच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला उलट्या दिशेने आलेल्या बोलेरो जीपची धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या अपघाताची माहिती दुचाकी चालक भगवान सखाराम चिपळुणकर यांनी पोलिसांना दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ते त्याचे
ताब्यातील दुचाकी (एमएच. ०८ / एक्स / ३२१७) ने ६ रोजी आवाशी येथुन मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण बाजूकडे आपले साईडने जात होते. रात्री ०९.५५ वाजताचे सुमारास पिरलोटे येथील विरुंगळा हॉटेलचे अलीकडे आले असता मुंबई गोवा जाणारे लेनचे चुकीच्या बाजूने आलेल्या बोलेरो कैम्पर गाडी तात्पुरता नंबर (एमएच ०८/आरसी/८२७) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही बोलेरो सुमित शेटप्पा पवार (वय १९ वर्षे, रा. खांदाटपाली, एस. एम. चिपळूणकर यांच्या क्रशरवर ता. चिपळूण) चालवत होता.
या अपघातात भगवान चिपळूणकर गंभीर जखमी झाले. त्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.









