चिपळूण ( वार्ताहर) : तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन पिंपळी खुर्द येथे कातकरी समाजाची सभा बहुसंख्येने पार पडली. या सभेत समाजाच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
चिपळुण तालुक्यांतील कातकरी समाज गेली अनेक वर्षे एकाच ठिकाणी वावरत आहेत. काही लोकांना घरांसाठी जमीन नाही. तर काही लोकांना घर बांधणी पुरतीच जमीन आहे. गेली अनेक वर्षे कातकरी बांधव एकाच ठिकाणी असल्याने त्यांना सुरवातीला त्यांना घरे हि माती, विटा, भिंतीची होती. त्यानंतर त्यांना 28, हजार 500 रु मध्ये घरकुले मिळाली. या घरकुलांना गेले 20 वर्षे होऊन गेली आहेत. सध्या या घरांमध्ये आता तर राहणे अशक्य झाले आहे. पुर्ण लोखंड, पत्रांना गंज चढलेली आहे. या 28,500 मधील इंदिरा आवास घरकुल योजनेचा सर्व्हे करुन जुनी घरकुले आहेत. त्यांना PM जन धन योजनेचा लाभ मिळावा,अशी चिपळूण तालुक्यातील आदिवासी आदिम कातकरी संघटनेची मागणी आहे.
अनेक वर्षे कातकरी समाज हा प्रामाणिकपणे काम करत आपला उदरनिर्वाह करत आहे. या गोष्टी कडे महाराष्ट्र शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. अनेक योजना राबविल्या जात नाहीत,तर त्या योजना राबविणे गरजेचे आहे.
कातकरी समाज हा अनेक योजना पासून वंचित आहे. त्यांना वेळोवेळी योजनांचा लाभ मिळण्यासाठी मार्गदर्शन केले पाहिजे. PM जनमण योजनेचा सर्वे पुन्हा करण्यात यावा अशी मागणी समाज्याच्या सभेत करण्यात आली आहे. कातकरी समाज कामानिमित्ताने स्थलांतरित झाले होते ते सर्व्हे पासून वंचित आहेत. ज्या ठिकाणी कातकरी समाज स्थायिक आहे, त्या ठिकाणी लोकांना जाण्यासाठी रस्ता, पायवाट, पाण्याची गैरसोय आहे. अशा समस्यांकडे महाराष्ट्र शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
चिपळूण तालुक्यात 32 पेक्षा जास्त ठिकाणी कातकरी लोकवस्ती आहे. हजारोंच्या पटीत लोकसंख्या आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून योग्य तो निर्णय घेणे फार महत्त्वाचे आहे. एखादा जातीचा दाखला काढण्यासाठी दोन तीन महिने कालावधी जातो, आणि एखादा अर्जंट दाखला जेव्हा लागतो तेव्हा मात्र मिळत नाही, आणि तो लाभार्थी असेल तर तो त्या योजनेपासून वंचित राहतो,हे कोठे तरी थांबले पाहिजे. तस न होता लवकरांत लवकर दाखला मिळावा अशी मागणी समाज्याच्या सभेत करण्यात आली.
चिपळूण तालुक्यातील कातकरी समाजांच्या सभेला चिपळूण पंचायत समितीचे कृषी अधिकारी संतोष भोसले, संतोष जाधव ,आदिवासी आदिम कातकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष विलास निकम , जिल्हाचे जिल्हा सचिव चंद्रकांत जाधव, चिपळूण तालुका अध्यक्ष संजय जगताप, चिपळूण तालुका उपाध्यक्ष दिनेश पवार, तालुका सचिव महेश जाधव, चिपळूण कार्याध्यक्ष विकास निकम, गणेशपुर वाडी प्रमुख श्रीकांत पवार, आदिम संघटना सदस्य सुरेश पवार, तिवरे ( राजवाडा) मनोहर वाघे, गाणे (राजवाडा) वाडी प्रमुख कोळकेवाडी वाडी प्रमुख संतोष निकम,व निरबाडे खालची वाडी प्रमुख प्रकाश पवार,कुटरे वाडी प्रमुख महेंद्र निकम, मुंढे वाडी प्रमुख: विजय निकम, राजेश निकम, कुंभार्ली वाडी प्रमुख गौरेश हिलम, महिला प्रमुख सौ दिपाली पवार, ओवळी श्रीमती लक्ष्मी जाधव, माजी सरपंच कादवड सौ मंदा जाधव,सौ राजेश्री जाधव, सौ निलम निकम, सौ पुजा जाधव सुरेखा पवार, सौ अनिता जाधव,सौ सुगंधा जाधव आदी उपस्थित होते












