मोकाट गुरांच्या प्रश्नाबाबत बोलताना समाज कंटकाची सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट

सकल हिंदू संघटनेची पोलीस स्थानकात धाव 

रत्नागिरी | प्रतिनिधी :
रत्नागिरी शहरातील मोकाट गुरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या मोकाट गुरांमुळे एका समाज कंटकाने शुक्रवारी सोशल मिडीयावर धार्मिक भावना दुखावल्या जातील अशी एक पोस्ट व्हायरल केली. त्यामुळे सकल हिंदू संस्थेन या तरुणा विरोधात तक्रार देण्यासाठी शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली होती.

रत्नागिरी शहरामध्ये जागोजागी रस्त्यावर ठिय्या मांडून बसलेली गुरे दिसून येत असतात. त्यामुळे काही वेळा अपघात होउन काही जणांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. बुधवारीच शिरगाव-गणेशवाडी येथे रस्त्यालगतच्या भूमिगत डीपीच्या अर्थिंगचा शॉक लागून एका मोकाट गुराचा मृत्यू झाला होता. नगरपरिषदेचे दुर्लक्ष होत असल्याने शहरात मोकाट गुरांचा त्रास सतत वाढत आहे. या मोकाट गुरांच्या प्रश्नावरुनच संशयित तरुणाने आक्षेपार्ह पोस्ट केली होती. सदर पोस्ट शहरात व्हायरल झाल्यावर सकल हिंदू संस्थेने शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. या प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु होती.