साखरपा l वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जाधववाडी येथील उत्तम कुमार जाधव यांच्या बंद असलेल्या गुरांच्या गोठ्यात मृत सापडलेला बिबट्या हा उपासमारीने झाल्याचे शवविच्छेदन केल्यानंतर स्पष्ट झाले
वनअधिकाऱ्यांनी बिबट्याची बारकाईने पाहणी केली असता नर जातीच्या बिबट्याच्या उजव्या पायाच्या वर जुनी जखम दिसून आली पशुवैद्यकीय अधिकारी आनंद राव कदम देवरुख यांनी शवविच्छेदन केले असता बिबट्याचा मृत्यू उपासमारीने झाल्याचे सांगितले
विभागीय वनाधिकारी रत्नागिरी (चिपळूण ) गिरीजा देसाई,सहाय्यक वनरक्षक वैभव बोराटे, मानद वन्यजीव रक्षक निलेश बापट, रत्नागिरी परीक्षेत्र वनाधिकारी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली देवरुख वनपाल तौफिक मुल्ला, वनरक्षक सहयोग कराडे, आकाश कडुकर, अरुण माळी यांनी मृत बिबट्यास अग्नी दिला .
अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वनविभागाच्या टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने प्रकाश सुतार वक्षेत्रपाल रत्नागिरी यांनी केले आहे.












