कणकवली :भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते तथा कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदगाव आठवडा बाजाराच्या दिवशी वृक्ष वाटप व जिलेबी वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी भाजपा तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, शक्ती केंद्र प्रमुख तथा नांदगाव सरपंच भाई मोरजकर ,असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, सोसायटी चेअरमन भगवान लोके,उपसरपंच सचिन परब,नांदगाव उपसरपंच इरफान साटविलकर,माजी पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके,गाव अध्यक्ष संजय पाटील,माजी उपसरपंच नीरज मोर्ये, माजी सरपंच सुरेश लोके,आयनल माजी सरपंच बापू फाटक,सुभाष परब,संतोष मिराशी,संतोष परब,आफ्रोजा नावलेकर,कमलेश पाटील,तोंडवली उपसरपंच दिनेश कांडर, मारुती मोरये, हनुमंत वाळके, तोसीम नावलेकर,राजू तांबे,व्यापारी संघ अध्यक्ष पप्पी साफळे,मनोज लोके,विजय आचरेकर,बाबू परब,सुशील इंदप ,ज्योती देसाई, प्रवीण डगरे, मारुती मोऱये,भूपेश मोरजकर, बाबल्या बोभाटे,जाफर कुणकेरकर आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.












