… अखेर शिरवली नं. १ शाळेची सात दिवसांनी वाजली घंटा

छत कोसळल्यानंतर पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याचा घेतला होता निर्णय

खेड(प्रतिनिधी)

खेड तालुक्यातील शिरवली नं. १ शाळेच्या वर्गखोल्याचे छत कोसळल्यानंतर ग्रामस्थांसह पालकांनी धोकादायक शाळेत पाल्यांना पाठवण्यास नकार देत तातडीने शाळेची दुरूस्ती न झाल्यास पंचायत समितीच्या आवारातच विद्यार्थ्यांसमवेत शाळा भरवण्याचा इशारा दिला होता. अखेर सोमवारी रात्री ग्रामस्थांच्या झालेल्या बैठकीत एकमुखी तोडगा निघाल्यानंतर पाल्यांना शाळेत पाठवण्याची तयारी पालकांनी दर्शवली.

सोमवारी रात्री ग्रामस्थांच्या झालेल्या बैठकीत धोकादायक स्थितीतील वर्गखोल्यांची तातडीने करण्याचा आग्रह ग्रामस्थांनी धरला असून शिक्षण विभागाने तसे मान्य केले आहे. त्यामुळे छत कोसळलेल्या वर्गखोल्यांची दुरूस्ती होईपर्यंत सुरक्षित असलेल्या वर्गखोल्यांसह अंगणवाडीत विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आल्याने अखेर
मंगळवारपासून किलबिलाट सुरू होताच शिक्षण विभागानेही सुटकेचा निःश्वास टाकला