खेड : प्रतिनिधी खेड रेल्वे स्थानक परिसरात गुरुवारी दुपारी रेल्वे ट्रॅकमध्ये पडून एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. नरेश नथुराम शिगवण (वय ३५, राहणार महाड, आंब्याचा टोक) असे या जखमी तरुणाचे नाव असून, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गुरुवार, दिनांक २९ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२:४७ मिनिटांच्या सुमारास खेड रेल्वे स्थानक परिसरात नरेश शिगवण हा तरुण रेल्वे ट्रॅकमध्ये पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच भरणे नाका ब्रिजखाली तैनात असलेली ‘जगद्गुरु रामनंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान, नाणिज धाम’ यांची २४ तास विनामूल्य रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी रवाना झाली. रुग्णवाहिका चालक सुरज हंबीर यांनी जखमी तरुणाला तातडीने ताब्यात घेऊन पुढील उपचारासाठी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेने दाखवलेल्या कमालीच्या तत्परतेमुळे जखमीवर वेळेत उपचार सुरू झाले आहेत.









