गुहागर | प्रतिनिधी : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार भविष्यात चांगले यशस्वी आणि नवोपक्रमशील नागरिक बनण्यासाठी सर्व शालेय विद्यार्थ्यांमध्ये विशिष्ट कौशल्ये आणि क्षमता विकसित होणे गरजेचे आहे. या कौशल्यांमध्ये पाणी व नैसर्गिक संसाधनांचे जतन , स्वच्छता इ. च्या अनुषंगाने पर्यावरण जाणीवजागृती विकसित करणे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी संवेदनशीलता विकसित करणे. सद्यस्थितील पार्यावारणीय समस्या जाणून घेणे. शाश्वत अन्न प्रक्रिया स्वीकारणे. परसबाग निर्मितीमुळे विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण होऊन त्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळणे.
ताज्या भाजीपाल्यांचा समावेश पोषण आहारात होऊन विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार उपलब्ध करून देणे. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळेमध्ये परसबागेची निर्मिती करून सदर परसबागेतून उत्पादित भाजीपाल्याचा समावेश पोषण आहार करणे. असे विविध उद्देश डोळ्यासमोर ठेऊन इको क्लब फॉर मिशन लाईफ या उपक्रमा अंर्तगत शास्वत अन्न प्रक्रिया स्वीकारणे या थीम अंतर्गत जिल्हा परिषद आदर्श शाळा शिवणे नं. 2 शाळेत बचत गट , पालक , शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या मदतीने परसबागेची निर्मिती करण्यात आली.
परसबागेची निर्मिती कशी करावी ? याचे मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक कृषी सखी निर्जला अंनत तटकरे सडेजांभारी आणि प्रेरणा प्रविण सकपाळ ( बचतगट सी आर पी गाव पाचेरी ) यांनी केले.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवणे गावतील पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांनी परसबागेची निर्मिती केली. यामध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना वापरून आपण एकाच परसबागेतून विविध भाज्या कसे घेऊ शकतो ? याची माहिती आणि निर्मिती केली. या परसबागेत पोकळा, लालमाठ, हिरवा माठ , गावर ,भेंडी यांची पेरणी करण्यात आली.
परसबाग निर्मितीमध्ये शिवणे गावच्या प्रथम नागरिक सरपंच मनस्वी महेंद्र ठोंबरे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तृप्ती शशिकांत मेस्त्री, जान्हवी विजय पागडे, सुचिता सचिन मेस्त्री, सानवी सचिन जोशी, मनिषा रामचंद्र जोशी, कल्पना नारायण जोशी, मानली मनोज मेस्री , मुख्याध्यापक दिनेश काशिनाथ जाक्कर, शिक्षण सेवक प्रदीप बोंद्रे, अंगणवाडी मदतनीस प्रिया सुर्वे आणि विद्यार्थी उपस्थित होते.












