*लायन्स क्लब रत्नागिरीच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या शपथविधी सोहळा संपन्न*!!

 

लायनिस्टिक वर्ष २०२४-२५ च्या नवीन पदाधिकाऱ्यांचा शपथविधी दिनांक ७जुलै २०२४ रोजी हॉटेल वीवा ऍक्झिक्युटीव , मारुती मंदिर च्या सभागृहात संपन्न झाला.

 

शपथविधी समारंभ PMJF CA ला केशव फाटक सर,सावंतवाडी क्लब यांच्या हस्ते संपन्न झाला. नूतन अध्यक्ष ला. गणेश धुरी व त्यांची कार्यकारिणी यांना शपथ देण्यात आली. मावळत्या अध्यक्षा MJF ला शिल्पा पानवलकर यांनी नूतन अध्यक्ष ला. गणेश धुरी यांच्याकडे क्लबची सूत्रे सुपूर्त केली.

 

अध्यक्ष – ला. गणेश धुरी

सचिव – ला. विशाल ढोकळे

सह सचिव – ला. शरद नागवेकर

खजिनदार – ला. अमेय वीरकर

सह खजिनदार – ला. सुमित ओसवाल

प्रथम उपाध्यक्ष – ला. दीप्ती फडके

द्वितीय उपाध्यक्ष – MJF ला. डॉ शिवानी पानवलकर

तृतीय उपाध्यक्ष – ला.संजय पटवर्धन

टेमर – ला. साक्षी धुरी

टेल ट्विस्टर – ला.मनोज सावंत

क्लब एक्सटेंशन चेअरमन – MJF ला सुनिल देसाई

मार्केटिंग आणि कम्युनिकेशन चेअरमन – ला. संकेत नवले

लायन्स क्वेस्ट चेअरमन – ला. प्रविण जैन

आय टी चेअरमन -ला अस्लम वास्ता

बुलेटिन एडिटर – MJF ला.डॉ संतोष बेडेकर

LCIF चेअरमन – MJF ला. सुप्रिया बेडेकर

क्लब ऍडमिनिस्ट्रेटर – MJF ला. पराग पानवलकर

GST चेअरमन – MJF ला. ॲड .शबाना वास्ता

GMT चेअरमन -MJF ला दत्तप्रसाद कुळकर्णी

GLT चेअरमन – MJF ला ओंकार फडके

GAT चेअरमन – ला. श्रेया केळकर

PRO – ला. ॲड.महेद्र मांडवकर

 

अशा सर्व पदावरच्या लायन सदस्यांना आपल्या ओघवत्या भाषेत PMJF ला केशव फाटक यांनी शपथ दिली. सर्वाना आपल्या पदाची जबाबदारी व कर्तव्य समजावून सांगितली. या कार्यक्रमासाठी गायडींग लायन पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ला. उदयजी लोध, माजी झोन चेअरमन ला. श्रेया केळकर, रिजन चेअरमन ला गजानन नाईक,झोन चेअरमन MJF ला डॉ निलेश पाटील,चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष MJF ला. डॉ. संतोष बेडेकर, संगमेश्वर लायन्स क्लब चे अध्यक्ष ला. महेश उपळेकर, ला. अपर्णा उपळेकर, तसेच लायन परिवारातील सदस्य , कुटुंबातील सदस्य, मित्र परिवार आवर्जून उपस्थित होता. नूतन सचिव ला.विशाल ढोकळे यांनी सर्वांचे आभार मानले.कार्यक्रमा चे सूत्र संचालन MJF ला. ओंकार फडके व MJF ला.पराग पानवलकर यांनी केले.