शनिवार दिनांक, ०६ जुलै रोजी रत्नागिरीतील सर्वंकष विद्यामंदिर येथे विद्यार्थी प्रतिनिधी यांचा शपथविधी सोहळा शाळेच्या अँफिथिएटर मध्ये विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या उपस्थितीत पार पडला.

‘लोकांनी, लोकांच्या हिताकरिता, लोकांकरवी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही.’ ही व्याख्या आपण शालेय जीवनात शिकतोच पण त्याची अंमलबजावणी करणे आणि लोकशाहीची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे या दृष्टीने शाळेत दरवर्षी विद्यार्थी प्रतिनिधींची निवड विद्यार्थ्यांमधूनच करण्यात येते. त्याप्रमाणे यावर्षीही इयत्ता तिसरी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने मतदान करून शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी हेड गर्ल आणि हेड बॉय यांची निवड केली. यात इयत्ता दहावीतील कु. कीर्ती सामंत आणि कु. शर्विल शिंदे यांची अनुक्रमे हेड गर्ल आणि हेड बॉय या पदांवर निवड झाली. त्याचप्रमाणे शाळेतील मंगलयान, गगनयान, फिनिक्स, लिओ या चार गटातील विद्यार्थ्यांनी खुल्या व निःपक्षपाती निवडणुकांद्वारे आपापल्या गटासाठी कॅप्टन, व्हाईस कॅप्टन, मिनिस्टर अशा प्रतिनिधींची निवड केली. त्यांची अनुक्रमे नावे पुढीलप्रमाणे, यात मंगलयान या गटातून कु. अंजनेय उपाध्याय(इ. ९वी), कु. आर्या करकरे(इ. ८वी), कु. हिमांशु सावंत(इ. ७वी), गगनयान गटातून कु. गीत गवाणकर(इ. ९वी), कु. इंशराह काझी(इ. ८वी), अंश गुंदेचा (इ. ७वी), फिनिक्स गटातून कु. सुमेध सुर्वे (इ. ९वी), कु. विवान सुर्वे(इ. ८वी), कु. वरद जागुष्टे (इ. ७ वी)तर लिओ या गटातून कु. प्रिशा इंदुलकर(इ. ९वी), कु. राधा शिंदे (इ. ८वी), कु. अल्विना काझी(इ. ७वी) यांची गटानुसार अनुक्रमे कॅप्टन, व्हाईस कॅप्टन, मिनिस्टर या पदांसाठी निवड झाली.
शनिवार दिनांक, ०६ जुलै या निवडून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींचा शपथविधी सोहळा पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात एका प्रार्थना नृत्याने झाली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मोनिका जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली. त्यांनी त्यानंतर आपले मनोगत मांडताना निवडून आलेल्या प्रतिनिधींना उद्देशून कार्य व कर्तव्ये यांची जाणीव करून दिली. कार्यक्रमाचे नियोजन शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीतील कु. चिन्मय आणि कु. सुझेन यांनी केले तर आभारप्रदर्शन कु. त्विषा (इयत्ता १०वी) हिने केले.









