कुडाळ/प्रतिनिधी : गांव बांबुळी, ता. कुडाळ गावचे रहिवासी श्री. संतोष शं. पळशीकर यांच्या पत्नी सौ. प्रिया सं. पळशीकर व धाकटे बंधू श्री. गणेश शं. पळशीकर यांच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमीत्त बांबुळी गावातील पुर्व प्राथमिक ते पदवी महाविद्यालयातील होतकरु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप पळशीकर कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले.
शैक्षणिक सुविधांच्या अभावी होतकरु विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये व त्यांनाही उत्साहाने शिक्षण घेता यावे या उदार हेतूने पळशीकर कुटुंबीयांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांना स्कुलबॅग, वह्या, वॉटर बॉटल, पेन व इतर चांगल्या प्रकारचे शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. प्राथमिक जिल्हा परिषद शाळा, गांव बांबुळी, ता. कुडाळ या शाळेमध्ये झालेल्या शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात व्यासपिठावरती बांबुळी गावचे सरपंच श्री. प्रशांत परब, उपसरपंच श्री. सुभाष बांबुळकर तसेच श्री. बच्चू मेस्त्री, सौ. दिपश्री परब, ग्रामपंचायत सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक श्री. मारुती गुंजाळ, तसेच पळशीकर कुटुंबातील श्री. संतोष पळशीकर, सौ. प्रिया पळशीकर, श्री. गणेश पळशीकर, श्री. मोहन परब, श्री. अभय परब, श्री. मणेरीकर, श्री. गणेश परब, श्री. निलेश परब तसेच विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. नितीन परब, श्री. शंतनु व शर्वरी, श्री. विशाल लोहोकरे, श्री. सन्नी लोहोकरे, श्री. मकरंद हिंगे यांनी योगदान दिले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना व उपस्थितांना अल्पोपहारचे देखील वाटप करण्यात आले.











