मसूरे | झुंजार पेडणेकर :मालवण तालुक्यातील गुरामवाड गोळवण पोईप मुख्य रस्त्यावर कुमामे येथील जयवंत घाडगावकर यांच्या घरानजीक असलेली मोरी रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने कोसळून वाहनांना धोका उत्पन्न झालेला आहे. या मार्गावरून कायमच मोठी वाहतूक चालू असून सदर मोरी कोसळल्याने रस्ता साईडला गाडी गेल्यास अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. गोळवण सरपंच सुभाष लाड यांनी उपविभागीय सार्वजनिक बांधकाम अधिकारी मालवण यांना माहिती देऊन याबाबत त्वरित उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.












