सावंतवाडी शहरासाठी आनंददायी बातमी : पाळणेकोंड धरण ओव्हर फ्लो

सावंतवाडी । प्रतिनिधी : गेले काही दिवस होत असलेल्या संततधार पावसामुळे सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाळणेकोंड धरणाच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पाळणेकोंड धरण ओव्हर फ्लो झाले असून सोमवारी दुपारी ३ वाजून १७ मिनिटांनी धरणाचा पहिला हायड्रोलिक दरवाजा उघडण्यात आला.

सावंतवाडी शहराला पाळणे कोंड धरणातून पाणीपुरवठा केला जातो. हे धरण पहिल्याच पावसात ओवर फ्लो झाल्यामुळे सावंतवाडीकरांसाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे. याबाबतची माहिती सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली आहे.