श्रीकृष्ण उर्फ बंडोपंत नामजोशी निवर्तले

 

माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या ,माखजन इंग्लिश स्कूल चे माजी मुख्याध्यापक श्रीकृष्ण सदाशिव उर्फ बंडोपंत नामजोशी निवर्तले.ते ९४ वर्षांचे होते.मूळ बुरंबाड गावचे असलेले श्री नामजोशी सध्या मुंबईत वास्तव्याला होते.

 

माखजन इंग्लिश स्कूल च्या इतिहासात सर्वाधिक काळ मुख्याध्यापक म्हणून १७ वर्षे सेवा बजावली.प्रारंभी त्यांनी रत्नागिरी जिल्हा परिषद ला प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून काम केले.पण विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिकवता यावं यासाठीं व तत्कालीन शाळेची गरज ओळखून त्यांनी उच्च पदस्थ सेवेचा त्याग केला व माखजन इंग्लिश स्कूल मध्ये माध्यमिक सहाय्यक शिक्षक म्हणून सेवेत रुजू झाले.पुढे त्यांनी मुख्याध्यापक पदाचा पदभार स्वीकारत १७ वर्षे सेवा वाहिली.शिस्तप्रिय,व कामात अतिशय काटेकोर अशी त्यांची ओळख होती.

 

 

१९७०-८० च्या दशकात ज्या वेळी १० वी चे निकाल अत्यल्प लागत आशा काळी, प्रतिकूल परिस्थितीत १० वी चा इंग्रजी विषयाचा १००% निकाल लावण्याचा इतिहास रचला.शाळेतील भव्य गुरुदक्षिणा सभागृह हा त्यांच्या कारकिर्दीत झाला.विद्यार्थी प्रिय अशा मुख्याध्यापकांना शाळा व संस्थेतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.