खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तळघर मराठी या शाळेत नुकतेच सेवा सहयोग फाउंडेशन पुणे यांच्यामार्फत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शाळेतील ४५ विद्यार्थ्यांना दप्तर, कंपास पेटी, वह्या व इतर साहित्याचे वाटप संस्थेचे पदाधिकारी सुयोग बेडेकर, विश्वास स्टोअर्स खेडचे मालक उमेश संसार, समीर घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा नंदिनी बंदर, उपाध्यक्ष वासुदेव साळवी, केंद्रप्रमुख रउफ सुर्वे यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.
शाळेतील सर्व मुलांना धामणी येथील सामाजिक कार्यकर्ते मनोज कदम यांनी ७२ डझन वह्या,तुकाराम कातळे यांनी सर्व विद्यार्थ्यांना पाण्याच्या बॉटल आदींचे वाटप केले.
शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात गावातील बेंडू धामणे रामभाऊ भुवड, प्रकाश पालकर , कृष्णा डाऊल, विजय कांदेकर, रवींद्र साळवी, नूतनगाव अध्यक्ष गोविंद डाऊल व अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे औचित्य साधून श्री बेडेकर यांनी शाळेच्या प्रगती विषयी समाधान व्यक्त केले. तसेच शाळेला वस्तू उपलब्ध करून दिल्याबद्दल अध्यक्षा नंदिनी गुजर यांनी आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाला केंद्रातील शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक अमर चव्हाण, दिपाली गुल्हाने,सुरैय्या सय्यद योगिता कुताळ या सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली.









