शिवबा मित्र मंडळ बोरगाव मोरेवाडी यांचा उपक्रम
चिपळूण : बेसुमार जंगलतोडीमुळे ग्रामीण भागातील वनसंपदा आणि नैसर्गिक सौंदर्य नष्ट होत आहे. पर्यायाने पर्यावरणाचा संतुलन बिघडत आहे. यासाठी झाडे लावा..झाडे जगवा..या शासनाच्या उपक्रमा अंतर्गत अनेक संस्था संघटना वृक्षारोपण करत असतात. मात्र लावलेली झाडे जगवणे त्यांचे संवर्धन करणे हे फार महत्त्वाचे आहे. आपल्या मुलाप्रमाणे किंवा कुटुंबा सारखे लावलेल्या झाडाचे संवर्धन करा. तरच वृक्षारोपणाचा हेतू सफल होईल, असा सल्ला पत्रकार संतोष (भाई) कुळे यांनी वृक्षारोपण कार्यक्रमात दिला.
चिपळूण तालुक्यातील शिवबा मित्र मंडळ बोरगाव मोरेवाडी या मंडळाच्या वतीने रविवार १४ जुलै रोजी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या वृक्षारोपण कार्यक्रमाच्या वेळी त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात पुढे बोलताना श्री. कुळे यांनी सांगितले की, सद्यस्थितीमध्ये प्रत्येक व्यक्तीने किंबहुना कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने एक तरी झाड लावलेच पाहिजे. कारण झाड आपल्याला जगण्यासाठी ऑक्सिजन, फळे, फुले, आणि इंधन सुध्दा देते. अनेक गोष्टींनी उपयुक्त झाडे आहेत. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आणि ही वनसंपदा जपण्यासाठी झाडे लावणे आणि संवर्धन करणे गरजेचे आहे.
मात्र बदलत्या काळामध्ये जंगल तोडीमुळे ग्रामीण भागातील जंगले नष्ट होत आहेत . त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. म्हणून पुनश्च एकदा ही वनसंपदा निर्माण करण्यासाठी झाडे लावणे काळाची गरज बनली आहे. आपल्या पूर्वजांनी ज्या पद्धतीने झाडे लावून त्याचे संवर्धन केले. त्याचप्रमाणे आताच्या युवा पिढीने वृक्षारोपण केले पाहिजे. शिवबा मित्र मंडळ बोरगाव मोरेवाडी या मंडळांनी वृक्षारोपण करून उत्तम कामगिरी केली आहे. त्यांचे काम अतिशय कौतुकास्पद आहे. मंडळाने वड, पिंपळ , जांभूळ, आंबा, चिंच आणि निव आवला अशी देशी जातीची सुमारे ३६० झाडे त्यांनी लावली आहेत. रस्त्याच्या कडेला आणि इतर ठिकाणी झाडे लावून एक चांगला संदेश दिलेला आहे, असे त्यांनी शेवटी सांगितले
यावेळी वृक्षारोपण कार्यक्रमाला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवासेना चिपळूण उपतालुका प्रमुख प्रीतम वंजारे
, चिवेली शाखाप्रमुख सागर शिर्के, रवींद्र कापले, कात्रोळी येथील श्री. जाधव, उद्योजक यशवंत हळदणकर , माजी सरपंच रमेश मोरे, संतोष हळदणकर मान्यवर या वृक्षारोपण कार्यक्रमाला उपस्थित होते. मंडळाचे पदाधिकारी मिलिंद मोरे,
सचिन चव्हाण, दत्ताराम सुर्वे,अनंत मोरे, अरुण मोरे, विकास साळुंखे, प्रवीण मोरे रमेश मोरे, सखाराम मोरे, विनायक नावले, नितीन चव्हाण, राजेंद्र चव्हाण, नितीन चव्हाण , सुरज मोरे संतोष साळुंके, यश वेदरे आणि अनंत मोरे या सर्वांनी मिळून हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला











