इस्त्रो अभ्यास दौऱ्याकरता चिपळूण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांची निवड

दोन शिक्षकांसह मराठी शाळेतील १८ विद्यार्थी या दौऱ्यात सहभागी होणार!

चिपळूण | प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा ‘जानू विज्ञान अनुभवू विज्ञान’ या उपक्रमांतर्गत त्रिवेंद्रम येथील इस्त्रो अभ्यास दौऱ्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषद शाळेतील २ शिक्षकांसह १८ विद्यार्थी व चिपळूण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांची निवड झाली आहे. हा अभ्यास दौरा १३ ते १८ मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा बंद पडत असताना तर दुसरीकडे विद्यार्थ्यांची संख्या घटत असताना हा अभ्यास दौरा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पुजार यांच्या संकल्पनेतून होत असून यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर टाकणारा हा दौरा होत असल्याने पालक वर्गांमधून समाधान व्यक्त होत आहे.

रत्नागिरी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून इस्त्रो या भारतीय अवकाश संशोधन संस्थेस भेट देण्याचा अभ्यास दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे. हा अभ्यास दौरा १३ ते १८ मार्च रोजी होणार आहे. या दौऱ्यात विक्रम साराभाई रिसर्च सेंटर व इस्त्रो रॉकेट लॉन्चिंग होणार आहे. तसेच स्पेस म्युझियम चा अनुभव विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.

इस्त्रो अभ्यास दौऱ्याकरिता रत्नागिरी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका श्रीमती माधवी मारुती पाटील, शिक्षक मुस्ताक अहमद इसाक तांबे, विद्यार्थी अथर्व हेमराज सप्रे, राजकृष्ण कैलास धाडवे, आयुर महेश मुलुख, श्रेया किरण शिगवण, आर्या नरेश कदम, रुद्र विनोद घोलप, विराज शिवराम घाणेकर, अंकिता सुनील गोरे, स्वरा निलेश पावरी, वैष्णवी श्रीधर पावरी, निकिता सुनील सुवरे, आर्य गणेश पवार, अश्विन पांडुरंग शेजाळ, श्रावणी संगम कांबळे, सिद्धार्थ संतोष आमणे, शार्दुल विलास तेंडुलकर, जस्मिन फैयाज हाजू, स्विजल विलास जाधव या विद्यार्थ्यांची तर जिल्हा परिषद रत्नागिरी समग्र लेखाधिकारी एस. एन. नाकटे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी आर. के. कांबळे. जि. प. समग्र शिक्षा कनिष्ठ अभियंता पी. एस. पाडळकर, पी. एस. देसाई, चिपळूण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांची देखील निवड झाली आहे.

इस्त्रो अभ्यास दौऱ्याकरता निवड झालेल्या विद्यार्थी शिक्षक व चिपळूण तालुका आरोग्य अधिकारी सौ. यादव यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. या अभ्यास दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडणार असल्याने पालक वर्गांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.