मुळदे गावात कृषीकन्यांकडून रक्षक सापळ्याबद्दल शेतकऱ्यांना माहिती

कुडाळ : उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे मधील ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम २०२४ अंतर्गत शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी आलेल्या कृषीकन्यांकडून शेतकऱ्यांना रक्षक सापळ्याबद्दल माहिती देण्यात आली. या प्रात्यक्षिकाद्वारे आंब्यांचे तसेच वेलवर्गीय भाज्यांचे फळमाशी द्वारे होणारे नुकसान कसे टाळता येईल या बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यामध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेला ‘रक्षक सापळा’ याबद्दल माहिती दिली व हा सापळा कसा वापरावा याचे कृषीकन्यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले. कृषीकन्यांनी या सापळ्याचे फायदे शेतकऱ्यांना पटवून सांगितले.

या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद नोंदविला. तसेच मुळदे गावच्या उपसरपंच श्रीम. अपूर्वा पालव यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित शेतकऱ्यांनी कृषीकन्यांचे आभार मानले. अशाच प्रकारचे अनेक कार्यक्रम येणाऱ्या दिवसांमध्ये मुळदे, ता. कुडाळ मध्ये ह्या कृषीकन्यांकडून पार पडतील.सदर गटामध्ये मनिषा सावंत, रुचिता देऊलकर, उर्मी वालावलकर, रसिका साबळे, ग्रीष्मा कुबल आणि नेहा धरणे या विद्यार्थिनींचा समावेश आहे