खेड (प्रतिनिधी) जिल्हा व्यापारी महासंघाकडून तालुका व्यापारी संघटनेची कार्यकारणी जाहीर करण्यात आली
असून अध्यक्षपदी सचिन करवा यांची निवड करण्यात आली आहे तर प्रमोद बुटाला यांची उच्च समितीच्या सदस्यपदी नियुक्ती केल्याचे यावेळी जाहीर करण्यात
आले.
अमित शेठ यांची सरसचिव सहाय्यक वरिष्ठ समिती म्हणून नेमणूक करण्यात आली. तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने शहरासह तालुक्यातील व्यापाऱ्यांची जिल्हा व्यापारी महासंघाची सभासद नोंदणी सुरू आहे. जास्तीत जास्त व्यापाऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ऋषीकेश कानडे यांनी केले आहे. यावेळी जिल्हा महासंघाच्या अध्यक्षपदी बिपीन पाटणे यांची फेरनिवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.









