वेंगुर्लेत दुचाकी- रुग्णवाहिका अपघातात वायरमन ठार ; एक गंभीर

वीज दुरुस्तीसाठी जात असताना घडली घटना

वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ले येथील वीज वितरण कंपनीचे दोन कर्मचारी मोटरसायकल ने रात्री वीज वितरण ची दुरुस्ती सेवा करण्यासाठी जात असताना यांची मोटरसायकल आणि एका रुग्णवाहिकेची धडक बसून वेंगुर्ले गाडीअड्डा नाका येथे अपघात झाला. या अपघातामध्ये दोघे ही कर्मचारी गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी गोवा बांबुळी रुग्णालयात नेले असता उपचारा दरम्यान एका चा मृत्यू झाला. वीज वितरण कंपनीचे वरिष्ट तंत्रज्ञ श्री. बाळा शंभा गावडे असे त्यांचे नाव आहे. तर त्यांच्या सोबत असलेला बाह्यस्त्रोत कर्मचारी श्री. शिरोडकर हा गंभीर जखमी आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.