शंकर वैद्य साखरपा
संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव बाजारपेठेतील स्मिता जितेंद्र शेडे वय ४२ यांच्या घरी सोमवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून दागिने व रोख रक्क्म अशी सुमारे १ लाख ८५ हजार रुपयांची चोरी करून पसार झाला. मिळालेल्या माहितीनुसार स्मिता शेडे या घराच्या पाठीमागे भांडी घासत होत्या तर मोठा मुलगा भूषण वय २० हा जेवण करून नुकताच बाहेर गेला तर छोटा मुलगा प्रशांत वय १३ हा झोपला होता यावेळी स्मिता शेडे या भांडी घासून घरात आल्या असता त्यांना दोन कपाटे उघडलेली दिसली.
कपाटातील रोख पंचे चाळीस हजार व साडे तीन तोळ्याचे दागिने असा १लाख ८५हजार रुपयांची चोरी झाली असल्याचे लक्षात आले असता त्वरित साखरपा पोलिसांशी संपर्क साधला . पोलीस घटनास्थळी दाखल होऊन वस्तूस्थितीची पाहणी करून पंचनामा करून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी श्वान पथक व ठसे तज्ञ दाखल झाले होते .मात्र श्वान जवळपास घुतमळले. याप्रकरणी साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे ए पी आय शबनम मुजावर अधिक तपास करीत आहेत.











