भाजपा युवामोर्चा तालुकाध्यक्ष अभी लाड यांनी वेधले अधिकाऱ्यांचे लक्ष
मालवण | प्रतिनिधी : रामगड येथे बीएसएनएल सेवा गेली 15 दिवस विस्कळीत झाली असून ग्राहकांना त्याचा फटका बसत आहे. दरम्यान या समस्यांबाबत भाजपा युवामोर्चा तालुकाध्यक्ष अभी लाड यांनी बीएसएनएल सावंतवाडी कार्यालय तसेच वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधत सेवा सुस्थितीत करण्याची मागणी केली. त्यानुसार बिघडलेली यंत्रणा दोन दिवसात चालू करण्यात येईल असे अधिकारी वर्गाने सांगितले आहे. तसेच टॉवर ठिकाणी लाईट गेल्यावर सेवा सूरू राहण्यासाठी इन्व्हर्टर यंत्रणा लावण्याची मागणीही अभी लाड यांनी केली आहे.











