सचिन वाजे जसंजसं बोलत जाणार तस तसं महाविकास आघाडीचे वस्त्रहरण होणार 

 

 

भाजपा नेते आ. नितेश राणे यांचा घणाघात 

पुण्यात उबाठाचा अली संकल्प मेळावा  

रत्नागिरी । प्रतिनिधी :सचिन वाजे जसे जसे बोलत जाणार तसं तसं महाविकास आघाडीचे वस्त्रहरण होणार आहे असा इशारा भाजपा नेते आ. नितेश राणे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाविकास आघाडीला दिला आहे. तर पुण्यात होणारा उबाठाचा अली संकल्प मेळावा आहे असा टोलाही त्यांनी उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

 

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. याच पर्श्वभूमीवर एकेकाळी अनिल देशमुख यांच्या सोबत असणारे पोलीस अधिकारी सचिन वाजे यानेच अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख त्यांच्या पीएच्या माध्यमातून वसुली करायचे असा आरोप करणारे पत्र त्याने देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे. यावर आ. नितेश राणे यांनी देशमुख यांना जोरदार टोल लगावले आहेत.

 

हातखंबा येथे पत्रकारांशी बोलताना आ. राणे म्हणाले, सचिन वाजे महाविकास आघाडीचा कलेक्शन एजंट होता. त्याच्याकडे सगळीच माहिती आहे. सचिन वाजे यांनी सत्य विधान केलं आहे आणि आता सत्य सचिन वाजेने बोलायला सुरुवात केली आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात पेन ड्राइव्ह नाचवणाऱ्या अनिल देशमुख यांनी हिम्मत असेल तर समोर येऊन खुलासा करावा, तशी हिंमत दाखवावी असे म्हटले आहे.

ते म्हणाले सचिन वाजे यांना दिशा सालीयान आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या खुना संदर्भातील सुद्धा माहिती आहे. सचिन वाजे जसे जसे बोलत जातील तसं तसं महाविकास आघाडीचे वस्त्रहरण होईल असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

 

दरम्यान आज पुणे येथे उबाठा गटाचा शिव संकल्प मेळावा आहे. त्याचीही खिल्ली नितेश राणे यांनी उडवली आहे. ज्यांच्या प्रचारात पाकिस्तानच्या घोषणा देण्यात आल्या, जिथे प्रचारात पाकिस्तानचे झेंडे नाचवले गेले, त्या उबाठा प्रमुख उद्भव ठाकरेंना हे राज्य इस्लाम राज्य करायचे आहे त्यामुळे या मेळाव्याचे नाव शिव संकल्प ठेऊ नये अली संकल्प मेळावा असे ठेवावे असा घणाघात आ. राणे यांनी केला.

 

महाविकास आघाडीतल्या सर्वांच्या कुंडल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत. फडणवीस मैदानात उतरले तर सर्वांचं वस्त्रहरण होईल असेही नितेध राणे म्हणाले.