राधाकृष्ण नगर येथील बिल्डिंगमध्ये घरफोडी; 32 हजार रुपयांचा मुद्देमालाची चोरी

रत्नागिरी ः प्रतिनिधी
शहरातील राधाकृष्ण नगर येथील बिल्डिंग च्या रुममधून दोन मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 32 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञाताने लांबवला. ही घटना रविवार 13 जुलै रोजी सकाळी 10.30 ते 11.35 वा. कालावधीत घडली आहे.
याबाबत जितेंद्र संजय पाटील (24,मुळ रा.शिरपूर,धुळे सध्या रा.राधाकृष्ण नगर,रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, रविवारी सकाळी ते नाष्टा करण्यासाठी आपल्या रुमबाहेर गेले होते. या संधीचा फायदा उठवत अज्ञाताने त्यांच्या दरवाज्याला असलेले लॉक काढून रुममध्ये असलेल्या दोन बॅगमधील दोन मोबाईल व रोख दीड हजार रुपये असा एकूण 31 हजारांचा ऐवज लांबवला. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.